पत्र लिहून झाल्यावर आपण खाली लिहितो 'कळावे' पण याचा पत्रातील आधीच्या मजकुराशी काही संबंध असतोच असे नाही. खरंतर पत्राचा समारोप मजकुराशी सुसंगत शब्दांनी व्हायला हवा असं माझं म्हणणं. उदा... १) प्रिय, तू ज्या रस्त्याने जात आहेस तो खूप डेंजर आहे. वळावे... २) मित्रा, तुझ्या प्रेयसीचा भाऊ तुला फटकवायला येत आहे. पळावे... ३) प्रिय, तुझ्या आवडीच्या भजीसाठी अडीच किलो कांदे पाठवित आहे. तळावे.... ४) प्रिय मित्रा, तू जिच्यावर लाईन मारत होतास तिला मी पटवून पिक्चरला घेवून जात आहे. जळावे... ५) प्रिय, तुझ्या आवडीचा स्पेशल गायछाप तंबाखू पाठवित आहे. मळावे... ६) प्रिय आई, तुला नको असलेली पोरगी घरात सून म्हणून आणणार आहे. छळावे... ७) मित्रांनो, इतक्या उदाहरणानंतर तरी माझा मुद्दा बरोबर आहे हे तुम्हाला कळावे... आणि तुम्ही हसुन हसून लोळावे... |
3 Apr 2015
Home »
funny whatsapp sms
,
marathi joke sms
,
marathi sms
,
whatsapp funny quotes
,
whatsapp funny sms
,
whatsapp group admin jokes sms
,
whatsapp jokes
,
whatsapp messages
,
whatsapp quotes
,
whatsapp sms
,
whatsapp status
» WhatsApp Funny Quotes In Marathi
0 comments:
Post a Comment